Khawakee
खाण्यावरच्या प्रेमासाठी...
For English Website, Click Here
       खास महाराष्ट्रीय घरगुती चवीचं नॉन-व्हेज आणि फराळाचे पदार्थ यांसाठी पुण्यात फक्त खावाकी फूड प्रॉडक्ट्स! चिकन आणि मटणच्या चविष्ट पदार्थांबरोबरच उत्कृष्ट सी-फूड (पापलेट, सुरमई, प्रॉन्ज) फक्त 'खावाकी'मधेच. चिकन आणि मटण बिर्याणी, मटण आणि फिश करी, क्रॅब करी (खेकड्याचा रस्सा), प्रॉन्ज करी (कोळंबीचा रस्सा), अशा अनेक डिशेस फक्त ऑर्डरनुसार ताज्या ताज्या बनवून दिल्या जातात. थोड्या 'हटके' डिशेस म्हणजे प्रॉन्ज पकोडा, मटण खिमा पॅटीस, आणि मटण चॉप्स. व्हेज मेनूमधे वेगळी डिश म्हणजे मसूर खिचडी, अगदी घरच्यासारखी. शिवाय, महाराष्ट्रीय सणासुदीला लागणारे उकडीचे मोदक, पुरणपोळी, खवापोळी, गुळपोळी, नारळाची करंजी, खाजाची करंजी, बेसन लाडू, आणि इतर फराळाचे पदार्थसुद्धा ऑर्डरनुसार वर्षभर उपलब्ध.

       चिकन, मटण, फिश, किंवा फराळाच्या पदार्थांच्या ऑर्डर्ससाठी संपूर्ण पुण्यात कुठेही 'फ्री होम डिलीव्हरी'.

खावाकी मेनू कार्ड

सादर आहे 'खावाकी'चा

स्पेशल सीकेपी मसाला
       सर्व पदार्थ ऑर्डरनुसारच बनवले जातात. फराळाचे पदार्थ, चिकन, मटण, किंवा फिशच्या अ‍ॅडव्हान्स ऑर्डरसाठी, संपूर्ण पुण्यात फ्री होम डिलिव्हरी! आमच्या प्रॉडक्ट्सची माहिती, फोटो आणि दर इथे पहा. ऑर्डरसाठी ऑनलाईन फॉर्म भरा किंवा आम्हाला 955-25-80-321 वर कॉल करा.

       ऑर्डरपूर्वी कृपया हे लक्षात घ्या: सर्व पदार्थ ऑर्डरनुसार बनवले जातात. किमान एक दिवस आधी ऑर्डर द्यावी. रु. ५०० च्या पुढील ऑर्डरसाठी फ्री होम डिलीव्हरी.
- फ्री होम डिलीव्हरी -
संपूर्ण पुण्यात कुठेही
आपली ऑर्डर नोंदवा!
खाण्याचा आनंद लुटा...

(सर्व पदार्थ ऑर्डरनुसार बनवले जातात. किमान एक दिवस आधी ऑर्डर द्यावी.
रु. ५०० च्या पुढील ऑर्डरसाठी फ्री होम डिलीव्हरी.)

कस्टमर काय म्हणतात...

** तुमच्या पदार्थांची चव आम्हाला खूप आवडली... अगदी घरच्यासारखी; खूप छान क्वालिटी टिकवून ठेवलीत तुम्ही... - श्री. भेलके, वारजे, पुणे

** कोथरुडमधे दुकान सुरु केलंत ना त्याबद्दल तुम्हाला थँक्सच म्हटलं पाहिजे. आता आम्ही वरच्यावर इथं येत राहणार. पण हां, खावाकीचे मोदक मात्र आम्हाला घरपोचच हवेत... - मिसेस कुलकर्णी, कोथरुड, पुणे

** अहो काय हे? आमच्या कोथरुडात दुकान सुरु करायला फारच वेळ लावलात तुम्ही... आम्ही कित्ती वर्षांपासून असं नॉन-व्हेज खाण्यासाठी आसुसलेले होतो! - मिसेस डोंगरे, पौड रोड, पुणे

** माझी आई पक्की सीकेपी आहे आणि असं ऑथेंटिक सीकेपी नॉन-व्हेज मिळणारी जागा शोधल्याबद्दल मला ती नक्की शाबासकी देईल. - मिसेस प्रधान, एरंडवणे, पुणे

** मागच्याच आठवड्यात मी पहिल्यांदा 'खावाकी'तून करंजी, चकली आणि रवा लाडू मागवले होते आणि मला नि माझ्या घरच्यांना ते इतके आवडतील असं वाटलंसुद्धा नव्हतं... खरंतर आम्ही मूळचे इंदोरचे आणि इंदोरचे लोक खरेखुरे खवय्ये म्हणून ओळखले जातात.. पुण्यातल्या खाण्याशी जुळवून घेणं मला जड गेलं होतं.. पण हे 'खावाकी'तून मागवलेले पदार्थ मात्र आमच्या घरी सुपरहिट ठरले.. आणि माझी पुढची ऑर्डरसुद्धा लगेच तयार होती... प्लीज अशीच क्वालिटी आणि सर्व्हीस मेन्टेन करा.. थँक्स अ लॉट... - सोनाली महाजन, वारजे, पुणे

** 'खावाकी'चे जवळजवळ सगळे पदार्थ ट्राय केलेत मी. एक्सेलंट क्वालिटी आणि सर्व्हीस. - मिसेस जोशी, कोथरुड, पुणे

** 'खावाकी'ची फ्री होम डिलीव्हरी सर्व्हीस एकदम मस्तच. मला हडपसरला डिलीव्हरी मिळाली! थँक्स खावाकी!! - मिसेस पवार, हडपसर, पुणे

** उकडीच्या मोदकांबद्दल मी ऐकलं खूप होतं; पण कधी टेस्टसुद्धा नव्हते केले. आता खावाकीच्या कृपेनं मोदकच माझी फेव्हरिट डिश झालीय!!! - मिस्‌ सुमती, चिंचवड, पुणे

** मला हे नाव खूप आवडलं - खा-वा-की - मराठमोळी चव आणि मराठमोळं नाव! आणि हो, डिलीव्हरी सर्व्हीस पण बेस्ट आहे हं तुमची... :) - मिसेस देशपांडे, नारायण पेठ, पुणे

** आम्ही नेहमी खावाकीच्या पुरणपोळ्या मागवतो आणि नेहमी तीच क्वालिटी, तीच टेस्ट. फारच छान! - मिसेस गलांडे, कर्वेनगर, पुणे

** आमच्याकडं एका पार्टीसाठी आम्ही संपूर्ण व्हेज मेनू मागवला होता. खावाकीच्या सीकेपी-स्टाईल डिश तर मस्तच होत्या. आता पुढच्या तीन पार्ट्यांसाठी आधीच ऑर्डर देऊन ठेवणार आहे. - मिसेस मुजुमदार, वारजे, पुणे

** खावाकीमधे माझा सगळ्यात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे 'उकडीचे मोदक'. संकष्ट चतुर्थी आली आणि खावाकीचा मोदक खाल्ला नाही असं होतंच नाही आता! - मिसेस राजे, कोथरुड, पुणे

** आम्ही खावाकीतून नॉन-व्हेज मेनू मागवला होता आणि टेस्ट तर मस्तच होती, पण डिलीव्हरीसुद्धा अगदी वेळेत मिळाली. - मिसेस देशमुख, सेनापती बापट रोड, पुणे

** एक्सेलंट क्वालिटी आणि रिझनेबल रेट्समधे पुरेशी क्वांटिटी... बाकीच्या डिशेस पण ट्राय करायला आवडेल. - श्री. एरंडे, डहाणूकर कॉलनी, पुणे